Maharashtra
महाराष्ट्र;
अजरामर राज्याची,अविस्मरणीय गाथा
_______________________________________
महाराष्ट्र मेला....म्हणजे राष्ट्र मेले,
महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले,
खरा वीर वैरी पराधीनतेचा,
"महाराष्ट्र....आधार या भारताचा".
आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊ चा लढाऊ बाणा घेऊन धारोष्ट रक्त वाहून,ज्या निधड्या छत्यांनी घोड्यांच्या टापा दिल्ली च्या तख्तापर्यंत नेल्या त्या छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र.
ग्रंथ व संतासंप्रदयाचे बहुमोल देणं असलेल्या,ज्ञानोबा माऊली- तुकारामांच्या अभंगानी पावन झालेला हा महाराष्ट्र.अस्पृश्यांना जीवनाचा हक्क मिळवून देणाऱ्या शाहू,फुले,आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र,आज आपल्या ६०व्या वर्षात पदार्पण करतोय.
१. भारताचे स्वातंत्र्य व महाराष्ट्र एकीकरण समिती.
- १५/८/१९४७ ला औपचारिक दृष्ट्या भारत जगाच्या नकाशावर आला.पण स्वातंत्र्याला वर्षही पूर्ण होत नाही तोच,भाष्यावर प्रांतांच्या मागण्या जोर पकडू लागल्या.म.गांधी व लो.टिळक ह्या मागणीचे समर्थक होते,पण भारताचे नवीन सर्वे- सर्वा ;नेहरूंला ही संकल्पना रुचत नसे.
- काँग्रेसच्या ह्या धोरणांमुळे ई.स.१९४६ ला "महाराष्ट्र एकीकरण समिती" चा जन्म झाला.संयुक्त महाराष्ट्र हा या समिती चा उद्देष.
२. दार कमिशन व जे. व्ही.पी कमिटी
- १९४८ साली दार कमिशन व जे.व्ही.पी कमिटी ने शासनाला दिलेल्या अहवालात त्यांनी भाषावर प्रांत रचनेला विरोध दर्शवला व महाराष्ट्रातील लोकांवर अपमानास्पद टिपण्णी केली.
३. फजल अली आयोग व असंतोष
- १९५५ मध्ये फजल अली राज्य पुनर्रचना आयोगाने शासनाला अशी शिफारस केली की मुंबई+सौराष्ट्र=मुंबई प्रांत ; व प.महाराष्ट्र + विदर्भ =महाराष्ट्र प्रांत तयार करावा.पण या विरुद्ध महाराष्ट्रात असंतोषाचे डोंब उसळले.
- नेहरूंनी त्वरित सौराष्ट्रसह गुजरात , विदर्भासह महाराष्ट्र ,व वेगळा मुंबई प्रांत तयार करायचे ठरवले.पण त्रिराज्य योजना हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट आहे असं समाजात,महाराष्ट्रात आंदोलनाचा वणवा पेटला.
४. मोरारजीचा क्रूर कारभार.
- महाराष्ट्रात कधी नव्हे ते कम्युनिस्ट,सोशलिस्ट,प्रजासमजवादी नेत्यांनी एकत्र येऊन हा लढा हातात घेतला.से.बापट,बा.आंबेडकर,एस.एम.जोशी,प्र.ठाकरे यांनी नेतृत्व केले.आत्रेंनी "मराठा" दैनिकातून सरकारवर बोचरी टीका सुरू केली.
- २०/११/१९५५ रोजी मोरारजी देसाई व स.का.पाटील यांनी मुंबईत चौपाटी वर सभा घेतली.त्यात मोरारजी यांनी प्रक्षोभक विधान केलं,ते म्हणाले,"आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही".लोकांनी संतापून सभा उधळवून लावली.इथून ह्या संघर्षाच्या रक्तरंजित पर्वाची सुरुवात झाली.
- १६/१/१९५६ ते २३/१/१९५६ या ७ दिवसात मोरारजी च्या आदेशावरून ४४२ वेळा मुंबईत गोळीबार करण्यात आले.
५. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना.
- आंदोलनाची झळ दिल्लीत पोहचताच,भारताचे अर्थमंत्री सी. डी.देशमुख यांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अंन्यायविरोधात त्यांचा राजीनामा दिला,याने आंदोलनाला खूप बळ मिळाले.
- १९५६ ला नेहरूंनी गुजरात व महाराष्ट्र मिळून एक द्विभाषिक राज्य बनवले.
- पण सरतेशेवटी येणाऱ्या निवडणूका लक्ष्यात घेऊन अखेर मुंबईसह महाराष्ट्र या राज्याला मान्यता मिळाली.
६. सोनेरी क्षण.
- मुंबईची उभारणी व विकास गुजराती भांडवलदारांनी केल्याचे गुजराती भाषिक बोलत होते,त्याचे व्याज म्हणून ५० कोटी₹ देऊन व १०७ लोकांचा प्राण घेऊन मुंबई महाराष्ट्राला मिळाली.
- १मे १९६० ला महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वात आले,मुंबई या राज्याची राजधानी घोषित झाली.
- यशवंतराव चव्हाण स्वातंत्र्य महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.
स्वतंत्र महाराष्ट्राचा हा सोहळा साजरा करताना,लता दीदींनी मुंबईत हे अजरामर गीत गायले,
"बहु असोत सुंदर, संपन्नती महान,
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा"
. -Aniket Pawar
Jay maharashtra
ReplyDeleteजय महाराष्ट्र ❤️
ReplyDelete