Maharashtra

महाराष्ट्र; अजरामर राज्याची,अविस्मरणीय गाथा _______________________________________ महाराष्ट्र मेला....म्हणजे राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, "महाराष्ट्र....आधार या भारताचा". आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊ चा लढाऊ बाणा घेऊन धारोष्ट रक्त वाहून,ज्या निधड्या छत्यांनी घोड्यांच्या टापा दिल्ली च्या तख्तापर्यंत नेल्या त्या छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र. ग्रंथ व संतासंप्रदयाचे बहुमोल देणं असलेल्या,ज्ञानोबा माऊली- तुकारामांच्या अभंगानी पावन झालेला हा महाराष्ट्र.अस्पृश्यांना जीवनाचा हक्क मिळवून देणाऱ्या शाहू,फुले,आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र,आज आपल्या ६०व्या वर्षात पदार्पण करतोय. १. भारताचे स्वातंत्र्य व महाराष्ट्र एकीकरण समिती. १५/८/१९४७ ला औपचारिक दृष्ट्या भारत जगाच्या नकाशावर आला.पण स्वातंत्र्याला वर्षही पूर्ण होत नाही तोच,भाष्यावर प्रांतांच्या मागण्या जोर पकडू लागल्या.म.गांधी व लो.टिळक ह्या मागणीचे समर्थक होते,पण भारताचे नवीन सर्वे- सर्वा ;नेहरूंला ही संकल्पना रुचत नसे. काँग्रेसच्या...